rat२३p१२.jpg-
२६O२६६७१
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना रवी पंडित. सोबत अमृता कटारा, डॉ. कौशल प्रसाद आदी.
----
कृत्रिम बुद्धिमत्ता आव्हान नसून संधी
रवी पंडित ः ‘फिनोलेक्स अॅकॅडमीत’ स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : भारत हा तरुणांचा देश आहे. संधी या आपल्या पुढ्यात आव्हान म्हणून येत असतात. निसर्गात कुठलीही गोष्ट तीन घटकांपासून बनलेली असते, ऊर्जा, सामग्री आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये संवेदना, समज व निर्णय या तीन घटकांचा समावेश होतो. आज नैसर्गिक बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेत आहे; पण हे आव्हान नसून संधी आहे. आपण जर सृजनशील असू तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्याला कोणताही धोका नाही. समिक्षात्मक विचारसरणी, चांगली अभिव्यक्ती व सर्जनशीलता ही तीन कौशल्ये असतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आपण स्थिर राहू शकतो, असे प्रतिपादन केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अध्यक्ष रवी पंडित केले. फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
रत्नागिरी झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (उत्तर गोवा) वसंत दाभोळकर, अध्यक्षस्थानी मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद उपस्थित होते. या प्रसंगी दाभोळकर म्हणाले, फिनोलेक्स कॉलेजमधील निकोप शैक्षणिक वातावरणाचा मला माझ्या भविष्यातील प्रगतीसाठी खूप फायदा झाला. येथे बरीच कौशल्ये शिकावयास मिळाली. विद्यार्थ्यांनीही आपले भविष्य उज्ज्वल व समृद्ध बनवण्यासाठी कॉलेज जीवनामध्ये निरनिराळी कौशल्ये आत्मसात करावीत.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा, भारतीय ज्ञानाचा समृद्ध वारसा, त्याचा वैज्ञानिक पाया, त्याची आधुनिक काळातील गरज या सर्वांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या दृष्टीने ‘भारतस्य राजपरंपरा : इतिहासस्य स्वर्णयुगम’ ही एक आगळीवेगळी स्पर्धा व प्रदर्शन घेण्यात आले होते. अनुष्का घाणेकर व जिज्ञा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यांनी मान्यवरांचे स्वागत करून परिचय करून दिला. उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव यांनी आभार मानले.
---
कोट
फिनोलेक्स महाविद्यालयाची स्थापना कै. प्रल्हाद छाब्रिया यांनी केली. आत्तापर्यंत या महाविद्यालयातून काही हजार विद्यार्थी अभियंता होऊन बाहेर पडले व बरेच उद्योजक होऊन संपूर्ण जगात अर्थपूर्ण योगदान देत आहेत. महाविद्यालयाचा सकारात्मक परिणाम कोकणावर पडलेला दिसून येतो. अभियांत्रिकी क्षेत्राचे भवितव्य हे मानव व यंत्र यांच्या स्पर्धेवर अवलंबून नसून, मानवी व कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहयोगावर अवलंबून असेल.
- अमृता कटारा, अध्यक्षा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.