कोकण

साडेपाच हजार शेतकरी बनले हायटेक

CD

राजापुरातील शेतकरी बनले हायटेक
‘एआय अ‍ॅप’चा वापर; हवामानातील बदलांसह माहिती क्लिकवर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित महाविस्तार हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. तालुक्यातील ५ हजार ६०० शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप घेतले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. हवामानातील बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या स्थितीमध्ये महाविस्तार अ‍ॅप शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे.
सातत्याने होणारे हवामानातील बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, माहितीचा अभाव आणि चुकणारे अंदाज आदींमुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यातून नफा-तोटा याचा ताळेबंद जुळवताना शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. या साऱ्या समस्यांमध्ये शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे एआय महाविस्तार हे अ‍ॅप कृषी विभागाने विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीसंबंधित अपडेट, रिअलटाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेतीपद्धतींचे मार्गदर्शन यांसह अन्य विविध प्रकारची माहिती घरबसल्या मिळत आहे. एआय चॅटबॉटवर पिकसल्ला, पीकनिहाय लागवड ते साठवण, मृदा आरोग्यपत्रिका, खतमात्रा गणक, हवामानास अनुकूल शेतीपद्धती, कीड व रोग, बाजारभाव, डीबीटी योजना, गोदाम याबाबत मार्गदर्शन मिळते.
-----
चौकट
शेती करणे होणार सुलभ
अ‍ॅपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मराठीत त्वरित उत्तर देते. स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी यांचे योग्य नियोजन करू शकतात तसेच स्थानिक व राज्यातील बाजारपेठेतील पिकांचे दर रिअल टाइममध्ये दाखवते. अ‍ॅपवर शेतीशाळेचे वेळापत्रकही असून, त्यानुसार ऑनलाइन शेतीशाळेला हजेरी लावता येईल. उपलब्ध व्हिडिओंच्या माध्यमातून मृद व जलसंधारण, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, पीक लागवड पद्धत, पीक संरक्षण, कृषी वनीकरण, कृषी व्यवसाय यांसह यशोगाथा, पशुपालन, शेतीशाळा आदींविषयीही सविस्तर माहिती मिळते. शेतकऱ्यांना पिकांची पेरणी ते शेतमालाची विक्री यापर्यंतचे नियोजन करणे सुलभ झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT