swt2311.jpg
26696
कुडाळ ः माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)
पुष्पसेन सावंत यांचे कार्य लोकाभिमुख
उमेश गाळवणकर ः कुडाळात सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः जनसामान्यांचा नेता, समाजकारणावर श्रद्धा ठेवून राजकारण करणारे आमदार म्हणून पुष्पसेन सावंत यांची ओळख होती. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून काम करणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले.
श्री. गाळवणकर हे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जनसामान्यांचे कैवारी पुष्पसेन सावंत हे महाराष्ट्रातील एक समाजवादी विचाराने भारावलेले प्रसिद्ध राजकारणी आणि समाजसेवक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जनता दल, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमार्फत राजकारण व समाजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना ''जनसामान्यांचे नेते'' म्हणून ओळखले जात होते. जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुष्पसेन सावंत यांच्या कार्याची ओळख आजच्या तरुण पिढीला व्हावी व त्यांनी जे काही आदर्श आपल्यासमोर ठेवले आहे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आजच्या तरुण पिढीने करावा.’’
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांचे लोकोत्तर कार्य याचे सतत स्मरण व्हावे, या उद्देशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रा. अरुण मर्गज यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिलदार, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, तसेच एक ट्रक ड्रायव्हर ते आमदार यापर्यंत त्यांच्या समाजकारणी, राजकारणी, प्रगतशील शेतकरी, शिक्षण संस्था चालक व जनसामान्यांचा धाडसी नेता या प्रवासाची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी शांभवी मार्गी-आजगावकर, अश्विनी पालव, मानसी धुरी, संगीता आकेरकर व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.