26701
गोळवण-परबवाडी येथील
कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : आमदार नीलेश राणे यांच्या विकासकार्याने प्रेरित होऊन आणि गावच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून, गोळवण-परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शाखाप्रमुख विकास परब यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोळवण-परबवाडी येथील सत्यवान चव्हाण, हेमंत परब, एकनाथ चव्हाण, विजय परब, प्रशांत परब, अनिल चव्हाण, राजन परब, गोविंद गोळवणकर, सुभाष परब, आनंद चव्हाण, विजय परब, वसंत गोळवणकर, वेदांत सावंत, शुभम चव्हाण, गौरव चव्हाण, गौरेश परब, बाळा परब, सुधाकर परब यांसह अनेक ग्रामस्थांनी भगवा हाती धरला. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गावातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. गोळवण शाखाप्रमुख परब यांनी या पक्षप्रवेशाबाबतची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.