कोकण

गोवा विद्यापीठात उद्या ''सागरी मच्छीमार'' संवाद

CD

गोवा विद्यापीठात उद्या
‘सागरी मच्छीमार’ संवाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः वर्ल्ड ओशन सायन्स काँग्रेस अंतर्गत सागरी मच्छीमार, वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञ यांना एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण ‘सागरी मच्छीमार संवाद व संशोधन-ते-अंमलबजावणी'' हा कार्यक्रम उद्या (ता. २४) गोवा युनिव्हर्सिटी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात गोवा मत्स्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्यांतील मच्छीमार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन नीलकंठ हळणकर (मत्स्य, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा मंत्री, गोवा सरकार) यांच्या हस्ते होणार असून, एआय आधारित ''माछली ॲप''चे उद्घाटन आणि ''भारताचा राष्ट्रीय सागरी जोखीम गुप्तवार्ता संक्षिप्त अहवाल २०२६'' या महत्त्वपूर्ण प्रकाशनाचे अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे.
या बैठकीत महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथील मच्छीमार प्रतिनिधींच्या सहभागातून सागरी सुरक्षितता, उपजीविका, तंत्रज्ञान, हवामान जोखीम आणि संशोधन-आधारित उपाययोजनांवर सखोल चर्चा होणार आहे. सागरी क्षेत्रातील धोरण निर्मिती आणि संशोधनाला प्रत्यक्ष मच्छीमारांच्या अनुभवांची जोड देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT