कोकण

-राज्य नाट्य स्पर्धा------

CD

rat२३p२३.jpg-
२६O२६७०२
रत्नागिरी ः शिवशक्ती तरुण मंडळ-सातारा या संस्थेने केलेल्या ‘पोकळ धिस्सा’ या नाटकातील एक क्षण.

राज्य नाट्यस्पर्धा------लोगो

ग्रामीण वास्तवातील
नाटक ‘पोकळ धिस्सा’

रत्नागिरी, ता. २३ ः गावातील सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी व अहंकारी निर्णयांमुळे सामान्य लोकांना अन्याय सहन करावा लागतो. श्रद्धा, परंपरा आणि समाजमान्यतेच्या नावाखाली सत्ता टिकवली जाते तर काही गावकरी भीतीपोटी विरोध करत नाहीत. ग्रामीण वास्तवातील या विसंगती आणि सत्तेचा दुरुपयोग प्रभावीपणे लेखक-दिग्दर्शक संतोष पाटील यांनी ‘पोकळ धिस्सा’ या नाटकातून मांडला आहे. हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत शिवशक्ती तरुण मंडळ-सातारा या संस्थेने हा प्रयोग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात केला. नेपथ्य आणि कलाकारांच्या अभिनयाला रसिकांनी दाद दिली.
------
पडदा उघडताच.. काळोखात कोंबडीच्या खुराड्यातून कोणीतरी कोंबड्या चोरून नेतो. त्यानंतर सकाळ होताच गावगाड्यातील कामे सुरू होतात, बाया-बापड्याची लगबग सुरू होते. कोणाची शेतीला पाणी द्यायला, गुरढोरं सोडायला, मंदिरात दर्शनाला तर कोणाची डेअरीवर दूध घालायला. ही कथा ग्रामीण समाजरचनेतील सत्ताकेंद्र, परंपरा, अंधश्रद्धा आणि अन्याय यांचे वास्तव चित्र उभे करते. गाव ‘हागणदारीमुक्त’ व ‘स्वच्छता अभियानात’ क्रमांक मिळवलेले असल्याने गावकरी अभिमान बाळगतात. गावात मारुतीचे मंदिर, व्यायामशाळा आणि कुस्तीची परंपरा आहे. गावचे पाटील यांचा मुलगा धाकले पाटील हा कुस्तीपटू असून, वस्ताद त्याला नवे डाव शिकवत असतात. हनुमान जयंतीचे नियोजन सुरू असताना गावात उत्साहाचे वातावरण असते.
दरम्यान, सता याच्या शेतातील कणसे चोरीला जातात व पिकाचे नुकसान होते. नामजा तपास करून हऱ्याने चोरी केल्याचे उघड करतो. चावडीवर चौकशी होत असताना हऱ्या सुरुवातीला नाकारतो; पण मारुतीची शपथ घ्यायला सांगितल्यावर तो चोरी कबूल करतो. शिक्षा म्हणून पाटील त्याच्याकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाचा खर्च करवून घेतात. दुसरीकडे, धाकले पाटील गावात आलेल्या पाहुण्याकडून कुस्तीत हरतात. या अपमानाचा राग मनात धरून पाटील मुलाणी कुटुंबाला गाव सोडण्याचा आदेश देतात. गावकरी या अन्यायाविरूद्ध आवाज उठवत नाहीत. चिंगीला हा निर्णय अन्यायकारक वाटतो; पण गावकीच्या दबावाखाली सर्व काही स्वीकारले जाते, अशी कथा पोकळ धिस्सा या नाटकाची आहे. गावगाड्याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
----
नेपथ्य ः निरंजन कडव, प्रकाशयोजना ः आदिती वर्मा, पार्श्वसंगीत ः हर्षदा पाटील,
वेशभूषा, रंगभूषा ः निर्मला खळतकर
----
पात्र परिचय
सता ः अथर्व वाघ, चिंगी ः ध्रुवी पाटील, भाभी भक्ती झणझणे, पाटील ः हेमंत खळतकर, धाकले पाटील ः साहील बडेकर, मुलाणीचाचा अतुल शिंदे, अम्मी ः प्रियांका शिंदे, मेहमान ः अनिल पवार, राजाभाऊ राजाराम शिंदे, नामजा ः अनिकेत खताळ, वस्ताद ः आकाश धुमाळ, हऱ्या ः संतोष पाटील, भागी सरिता नलावडे, इतर-निरंजन कडव, धनंजय घाडगे, अथर्व पवार, अश्विन पवार, कार्तिक पवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: अजित पवारांनी रोहित पवारांचं लग्न कसं जमवलं? विधानसभेच्या शोकप्रस्तावात सांगितली आठवण

पाकड्यांची रडारड सुरू! आम्हाला 'समान वागणूक' हवीय; क्रिकेट बोर्ड लिहिणार पत्र, IPL फ्रँचायाझींवर पक्षपातीपणाचा आरोप

Contaminated milk tragedy: भेसळयुक्त दुधामुळे ४८ तासांत किडनी निकामी होऊन चौघांचा मृत्यू ; १२ जण रूग्णालयात दाखल

Yerwada Fire : येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

Latest Marathi News Live Update : कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी द्यावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT