कोकण

घारपी शाळेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

CD

२६७२२


घारपी शाळेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
‘हिंद दी चादर’चे सादरीकरण ः शीख धर्मगुरू तेग बहादूर यांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश देणारा ‘हिंद दी चादर’ या सामूहिक गीताचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. संपूर्ण शाळा परिसर देशप्रेमाच्या सुरांनी निनादला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने व राष्ट्रप्रतिज्ञेने झाली. त्यानंतर शिक्षकांनी शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेतला. धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांनी दिलेल्या अद्वितीय बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत सांगण्यात आली. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान विभूतीने मानवतेच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले, ही ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरली.
विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या मनात सहिष्णुता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने गीताच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘हिंद एक चादर’ हे गीत सामूहिक गायन केले. गीताच्या सुरावटीतून भारताच्या विविधतेत दडलेले ऐक्य, संस्कृतींचा संगम आणि परस्पर सन्मानाचा संदेश प्रभावीपणे व्यक्त झाला.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी, अशा मूल्याधारित आणि इतिहासाशी निगडित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, मदतनीस संचिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...

Agricultural: पारंपरिक शेतीला पर्याय! कृषी क्षेत्रात ‘बिजली’ फुलांची क्रांती; शेतकऱ्यांसाठी कमाईचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT