कोकण

गुरू तेग बहादुरांच्या शौर्याला उजाळा

CD

swt2321.jpg
26731
कणकवली ः ‘हिंद दी चादर’ समूहगान कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. बाजूला इतर मान्यवर.

गुरू तेग बहादुरांच्या शौर्याला उजाळा
तृप्ती धोडमिसे ः कणकवलीत समूहगान कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ ः श्री गुरू तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
''हिंद दी चादर'' म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथे घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी तहसीलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्याने धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि त्याग यांचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहित मोठे मानावे. जात, पंथ, भाषा या पलीकडे सर्व मानव एकसमान आहेत. परस्परांप्रती आदर, करुणा आणि सहिष्णुता राखणे आवश्यक आहे. गुरू तेग बहादूर यांचे जीवन धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठीच्या बलिदानाचे तेजस्वी प्रतीक आहे.’’
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिकरित्या प्रेरणादायी गीत सादर केले. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले गीत समूहगानातून गायले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT