कोकण

नगरपंचायत कर्मचाऱ्यांची खासगी मालमत्तेमध्ये साफसफाई

CD

kan232.jpg
26748
कणकवली : नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांना निवेदन देताना नगरसेविका मनस्वी ठाणेकर.

नगरपंचायत कर्मचाऱ्यांची खासगी मालमत्तेमध्ये साफसफाई
चौकशी करण्याची नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली, ता. २३ : कणकवली नगरपंचायतीमधील आरोग्‍य विभागातील कर्मचारी हे खासगी मालमत्तेमध्ये साफसफाई करताना आढळून आले आहेत. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्‍यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना दिले.
श्री. ठाणेकर यांनी निवेदनात म्‍हटले आहे की, कणकवली शहरातील हर्णे आळी परिसरातील एका खासगी क्षेत्रातील कुंपणातील झाडेझुडुपे तोडणे, सुकलेला कचरा एकत्र करून जाळणे आदी कामांसाठी कणकवली नगरपंचायतीच्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला. कार्यालयीन वेळेत हे कामकाज केले जात होते. त्‍याबाबतचे व्हिडिओ आपणाकडे पाठविलेले आहेत.
नगरपंचायतीचे हे सार्वजनिक ठिकाणी वरिष्‍ठांच्या आदेशानुसार साफसफाई करू शकतात, परंतु त्‍यांनी खासगी मालकीच्या कुंपणात जाऊन शासकीय कामाकाजाच्या वेळेत तेथील सफाई करणे ही बाब चुकीची आहे. हे कर्मचारी नगरपंचायत प्रशासनाच्या परवानगीने खासगी क्षेत्रात सफाईसाठी गेले होते का? याची चौकशी करण्यात यावी.
दरम्‍यान, १४ ते १७ जानेवारी या कालावधीत नगरपंचायतीचा जेसीबी हर्णे आळीत सफाईसाठी पाठविला होता. हा जेबीसी कोणत्‍या कामासाठी पाठविला होता, याचीही चौकशी करावी, अशी मागणी नगरसेविका ठाणेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT