कोकण

इंटरनॅशनल रेकॉर्ड बुकमध्ये डॉ. विशाल कडणेंची नोंद

CD

swt2324.jpg
26750
डॉ. विशाल कडणे

इंटरनॅशनल रेकॉर्ड बुकमध्ये
डॉ. विशाल कडणेंची नोंद
तळेरे, ता. २४ : प्रदूषणमुक्त पर्यावरण, दुर्मीळ जातींचे वृक्ष व जैविक विविधता संरक्षित करण्यासाठी २०१८ पासून वृक्ष संवर्धनासाठी प्रा. डॉ. विशाल कडणे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. गेली १५ वर्षे वृक्षसंवर्धनामध्ये सक्रियपणे कार्यरत असलेले मूळचे तळेरे येथील व सध्या व्यवसायानिमित्त मुंबई येथे राहणारे डॉ. कडणे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पर्यावरण विषयात डॉक्टरेट असलेले डॉ. कडणे हे पर्यावरण व वृक्षसंवर्धनासाठी अनेक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. दहा हजारांहून अधिक वृक्ष संवर्धित केल्याने त्यांच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. त्यांचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.
.....................
swt2325.jpg
26751
वाडा : येथील अ. कृ. केळकर हायस्कूलसाठी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.

वाडा हायस्कूलला
शंभर ख्रुर्च्या भेट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ : तालुक्यातील वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलला हेमंत जामसंडेकर यांनी वडिलांच्या स्मरणार्थ १०० खुर्च्या देणगी स्वरुपात दिल्या. हा कार्यक्रम हायस्कूलच्या तात्या भिडे सभागृहात झाला. यावेळी प्रशालेच्या स्थानीय समितीचे अध्यक्ष शांताराम पुजारे यांच्याकडे खुर्च्या सुपुर्द करण्यात आल्या. श्री. जामसंडेकर यांनी, विद्यार्थ्यांनी सकारात्मक, आशावादी राहून जिद्द जोपासत सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असे सांगितले. यावेळी संस्थेचे संयुक्त खजिनदार प्रदीप आंबेरकर, दिनकर जोशी, सतीश रुमडे, मुख्याध्यापिका स्मिता तेली, माजी मुख्याध्यापक सुनील घस्ती आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात प्रशालेच्या क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय यशाबद्दल प्रमाणपत्र वितरण करून गौरव करण्यात आले. भूषण दातार यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT