कोकण

सर्फोजीराजे यांचे पुस्तक तंजावर- महाराष्ट्राला जोडणारे

CD

तंजावर-महाराष्ट्राला जोडणारे सर्फोजीराजांवरील पुस्तक
श्रीमंत बाबाजीराजे भोसले ः अॅड. पाटणे यांची राजांच्या आयुष्यावर अभ्यासपूर्ण मांडणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४: श्रीमंत सर्फोजीराजे यांनी तंजावरमध्ये ३४ वर्ष राज्य केले. लेखक ॲड. विलास पाटणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण पुस्तकात सर्फोजीराजाचे चरित्र सुंदरपणे उलगडले आहे. ग्रंथ छोटा असला तरी राजांच्या आयुष्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. हे पुस्तक दक्षिणेतील विस्तारित मराठा वंशाशी महाराष्ट्राला जोडण्याचे काम पुल म्हणून काम करेल. हा ग्रंथ दोन्ही प्रदेशातील संस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल. हे पुस्तक तंजावर आणि महाराष्ट्राला जोडणारे ठरेल, असे प्रतिपादन तंजावरचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांनी केले.
रविवारी हॉटेल विवेक येथे या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पानिपतकार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अर्थशास्त्रज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, डॉ. कल्पना मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विश्वास पाटील यांनी शहाजीराजांच्या दक्षिणेतील कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी ॲड. पाटणे यांच्या या वेगळ्या विषयावरील पुस्तकाचे स्वागत करून लेखकांनी अधिक संशोधन करून विस्ताराने विषय मांडावा, अशी सूचना केली. अॅड. पाटणे हे लोभस व्यक्तिमत्वाचे असून, त्यांना मी, १९९०च्या रत्नागिरीतील साहित्य संमेलनापासून ओळखतो. त्यांनी तंजावरच्या मराठा राजवटीतील घडामोडींचा वेध ओघवत्या शैलीत घेतला आहे, असे सांगितले.
दूरदर्शी, विद्वान सर्फोजीराजांनी तंजावरमध्ये मराठीचा झेंडा फडकवत ठेवला. त्यांची ओळख महाराष्टातील मराठी जनतेला होण्याकरिता आपण या पुस्तकाकडे वळलो, असे ॲड. पाटणे यांनी सांगिले. डॉ. मेहता यांनी प्रास्ताविक केले. ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : यवतमाळात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; विकृत तरुणाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT