कोकण

उपनगराध्यक्षांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करा

CD

शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करा
भाजप नगरसेवकांची मागणी; लोकप्रतिनिधींचा अपमान सहन करणार नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षांना अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना काल (ता. २३) निवेदन देताना महिला जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, गटनेते राजू तोडणकर, नगरसेवक नितीन जाधव, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, संदीप (बाबू) सुर्वे यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगरपालिकेसारख्या पवित्र सभागृहात शिस्त, सुसंस्कृत राजकारण आणि लोकशाही मूल्यांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र, लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे अपशब्द वापरणे ही बाब अत्यंत खेदजनक असून, यामुळे लोकशाही परंपरेला आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अशा घटनांमुळे प्रशासकीय कामकाजात बाधा निर्माण होत असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या वेळी लावून धरण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि योग्य न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT