‘सायले-गवळीवाडी’चे डांबरीकरण सुरू
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः तालुक्यातील सायले-गवळीवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाला आजपासून सुरुवात झाली. या वेळी सायले गावातील प्रशासक, ग्रामस्थ, ठेकेदार उपस्थित होते. मोठ्या प्रयत्नाने हे विकास मार्गी लागले असल्याने ग्रामस्थ संतुष्ट झाले आहेत. आमदार शेखर निकम यांच्या विकासात्मक धोरणातून या कामाला गती लाभली आहे.
रस्तेदुरुस्ती कामाचा पाठपुरावा करण्यासाठी सायले ग्रामपंचायत, गवळीवाडी स्थानिक, मुंबई ग्रामस्थ यांनी अपार मेहनत घेतली. त्याचबरोबर या मुचरी मतदार क्षेत्रातील गणप्रमुख संकेत खामकर, दीपक कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आलेले हे यश आहे. सायले गवळीवाडी हे तुरळक वस्तीचे क्षेत्र असले तरी या रस्त्यावरून अन्य कामांसाठी वाहनांची वर्दळ नित्य सुरू असते. दुर्गम भागातील ही वस्ती आता सुसज्ज रस्त्याने जोडली जाणार आहे. यापूर्वी या रस्त्यावर वाहने चालवणे अवघड होत होते. जागोजागी खड्डे, चढणक्षेत्राच्या ठिकाणी वाहनांची कुचंबणा होत होती. अशा अनेक समस्यांना तोंड देता नामुष्की ओढावत असे. हे काम प्रगतिपथावर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आज भूमीपूजन सोहळ्यात उपस्थित नागरिकांनी या कामाची गुणवत्ता आणि मार्गदर्शक सूचना यांची जाणीव ठेकेदार संदेश झगडे यांना करून दिली. या वेळी गुणवत्तापूर्ण काम करण्याची हमी ठेकेदार झगडे यांनी दिली. या कार्यक्रमाला ठेकेदार संदेश झगडे, राजेश झगडे, सायले गावातील प्रशासक शीला कदम, जबाबदार नागरिक विजय पांचाळ, अनंत धनावडे, गणपत महाडिक, दीपक कदम, राकेश कदम, प्रमोद कदम, शशांक कदम आवर्जून उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.