- rat२४p२.jpg-
२६O२६८५४
चिपळूण ः कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार बालसाहित्यिक मदन हजेरी यांना प्रदान करताना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत.
मदन हजेरी यांना बालवाङ्मय पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हजेरी हे बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३२ वर्षे ग्रंथालय कार्यवाह म्हणूनही काम पाहिलेले आहे.
सुरुवातीला स्व. श्रीकांत गोवंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी हजेरी यांनी बालसाहित्य चळवळीचा आढावा घेतला. या वेळी व्यासपीठावर उद्योजक प्रशांत पाटेकर, ''लोटिस्मा''चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते. मनीषा दामले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल लोंढे यांनी हजेरी यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘मसाप’ चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणबरे, ‘आपलं चिपळूण’ संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रवींद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.