कोकण

बांद्यातील केंद्रशाळेत डिजिटल संगणक लॅब

CD

26868

बांद्यातील केंद्रशाळेत
डिजिटल संगणक लॅब

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत पाऊल टाकत पीएम श्री केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे सुसज्ज डिजिटल लॅबचे उद्‍घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच आबा धारगळकर, श्वेता कोरगावकर, नरसिंह काणेकर, श्याम मांजरेकर, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, सुस्मिता जाधव, राजाराम सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, सदस्य हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, संपदा सिद्धये, श्रद्धा नार्वेकर आदी उपस्थित होते. श्री. कामत यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व भावी योजनांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी प्रास्ताविकातून डिजिटल लॅबची संकल्पना स्पष्ट करताना शाळेसमोरील विविध अडचणी व भविष्यातील नियोजन याविषयी मत मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : स्फोटात २० कामगारांचा बळी; वेदांता प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिकारी आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT