कोकण

मोकाट गुरे आवरा; अन्यथा आंदोलन

CD

26873

मोकाट गुरे आवरा; अन्यथा आंदोलन

ठाकरे शिवसेनेचा इशारा; मालवण नगराध्यक्षांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट फिरणाऱ्या गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख हेमंत मोंडकर यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे जाब विचारला. ही समस्या तातडीने मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही मोंडकर यांनी यावेळी दिला.
मालवण हे पर्यटन केंद्र असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते; मात्र सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप पाहायला मिळत आहेत. मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. भटकी कुत्री पादचाऱ्यांवर धावून जाणे, वाहनांचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून एखाद्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ कुत्र्यांचाच नाही, तर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. ही गुरे रस्त्यावरच घाण करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
----------
मुख्य रस्ते, गलल्यांमध्ये संचार
शहरातील मुख्य रस्ते आणि गल्ल्यांमध्ये जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला तीव्र पाऊल उचलावे लागेल, असा इशारा मोंडकर यांनी दिला आहे. संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करून मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर नागरिकांच्या हितासाठी ठाकरे शिवसेनेतर्फे बेमुदत उपोषण छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 24 बांगलादेशी नागरिक ताब्यात, तृतीयपंथीयांची संख्या अधिक

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT