कोकण

संत साहित्यामधून समभावाची शिकवण

CD

swt245.jpg
26871
बांदाः अ‍ॅड. देवदत्त परुळेकर यांना कै. प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

संत साहित्यामधून समभावाची शिकवण
अ‍ॅड. देवदत्त परुळेकरः बांद्यात ‘नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार’ प्रदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः संत साहित्य हे केवळ अध्यात्म नाही, तर ते जीवन जगण्याचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ माणसाला अंतर्मुख करतो आणि समाजाशी जोडून ठेवतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. देवदत्त परुळेकर यांनी येथे केले. श्री. परुळेकर यांना यंदाचा नट वाचनालयाचा मानाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध साहित्यिक (कै.) नेरुरकर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचनालयातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून (कै.) नेरुरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष नीलेश मोरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव राकेश केसरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. अ‍ॅड. परुळेकर यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अ‍ॅड. परुळेकर यांनी संत साहित्यावरील अभ्यासपूर्ण विचार मांडले. ज्ञानेश्वरीवरील भाष्य करताना त्यांनी (कै.) मामा दांडेकर दिंडी तसेच आषाढी वारीतील अनुभव कथन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक यांचा सत्कार करण्यात आला. (कै.) नेरुरकर यांचे विद्यार्थी अन्वर खान, डॉ. रुपेश पाटकर, प्रमोद कामत आणि डॉ. ज्योती बुवा यांनी भावना व्यक्त केल्या.
व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, संचालिका स्वप्निता सावंत उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रकाश नेरुरकर, किरण पिंगुळकर, अ‍ॅड. पी. डी. देसाई, गुरुदत्त नेरुरकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, मंगला परुळेकर उपस्थित होते. सचिव राकेश केसरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT