swt246.jpg
26872
सुकळवाडः येथील एमआयटीएम कॉलेजच्या पदवीदान समारंभात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञान रोजगाराला मारक
डॉ. भालचंद्र मुणगेकर ः सुकळवाड ‘एमआयटीएम’मध्ये पदवीदान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : तंत्रज्ञान विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. हे तंत्रज्ञान जितके फायद्याचे आहे, तितकेच ते रोजगारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे विज्ञानातील या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करायचा की तोट्यासाठी, याचा गांभीर्याने विचार राज्यकर्ते आणि वैज्ञानिकांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
सुकळवाड (ता. मालवण) येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम (इंजिनिअरिंग) कॉलेजचा पदवीदान सोहळा रविवारी (ता. २२) पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे, ॲड. महेश सरनोबत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.
डॉ. मुणगेकर यांनी, पदवी मिळाल्यावर नम्रता बाळगा आणि समाजातील उपेक्षित घटकांविषयी मनात सहानुभूती ठेवा, असे आवाहन केले. ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांचेही कौतुक केले. संतोष पाल यांनी, आयुष्यात आव्हाने येतच असतात, एआय हे देखील एक आव्हान आहे; मात्र, मनुष्य भावनेच्या आधारे काम करत असल्याने तो एआयपेक्षा नेहमीच श्रेष्ठ राहील. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर समाधान न मानता जबाबदारी घ्यायला शिकावे आणि स्टार्टअपसारख्या क्षेत्रात पाऊल टाकावे. कॉलेजच्या यशात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकारी संचालकांचा मोठा वाटा आहे, असे नमूद केले.
श्री. तरारे यांनी, पालकांनी तुम्हाला तळ्यापर्यंत नेले आहे, आता पोहून पुढे जाण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सांगितले. अशोक सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले. या सोहळ्याला प्रा. गौतम मुणगेकर, राकेश सावंत, उपप्राचार्य प्रा. विशाल कुशे, प्रा. पूनम कदम, प्रा. रोशनी वरक, प्रा. जानकी पावसकर, प्रा. संजय कुशे, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा. सिद्धेश शिंदे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.