कोकण

बामणोली देवस्थानचा शिमगोउत्सव २ मार्चपासून

CD

बामणोली देवस्थानचा
शिमगोउत्सव २ मार्चपासून
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : तालुक्यातील श्री चंडकाई, वाघजाई, ग्रामदेवता बामणोली या देवस्थानचा शिमगोउत्सव २ ते १२ मार्च या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी वाडीवर भोवतीसाठी फिरणार आहे.
दरवर्षीप्रमाणेच श्री चंडकाई, वाघजाई ग्रामदेवता मंदिरात सर्व ग्रामस्थ २ मार्चला पालखी सजवण्यासाठी जमतील. २ मार्चला दुपारी तीन वाजता सचिन ओक यांच्या येथून देवीची पेटी देवळात नेण्यासाठी गावकरी एकत्र येतील. त्यानंतर पालखी मंदिरात सजवली जाईल. देवळातून मानाप्रमाणे पालखी उचलली जाईल. वाजतगाजत पालखी सहाणेवर येईल. त्या आधी माडवल नाचवण्याचा कार्यक्रम होईल. ३ ला सकाळी ६ वा. देवीचा होम पेटवण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वा. सहाण भरण्याचा कार्यक्रम पार पडेल. सायं. ५ वा. सहाणेवर खेळ्यांची थाप आणि रात्री सचिन ओक यांच्या येथे पालखी वस्तीला राहील. ४ ला मानकरी यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन होईल. ५ व ६ रोजी पालखी डिंगणकरवाडी येथे भोवनीसाठी जाईल. त्यानंतर ७ ला पालखी पूर्ववणेवाडी येथे जाईल. ८ व ९ ला ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन पश्चिम वणेवाडी येथे होईल. तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वणेवाडी आणि आदर्श मित्रमंडळ पश्चिम वणेवाडी या ठिकाणी पालखी भोवनीला फिरेल. १० ला गवळवाडी ग्रामदेवतेचे प्रस्थान होईल. मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. ११ ला सकाळी ९ वा. भोवणी हिशोब सचिन ओक यांच्या निवासस्थानी होईल. १२ ला दुपारी ३ वा. सहाणेवर गोंधळ कार्यक्रम होईल त्यानंतर शिंपणे होईल. या उत्सवाला सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT