कोकण

ःदिवाणी न्यायालयाच्या स्थापनेबाबतच्या निर्णयाचे स्वागत

CD

- ratchl२४३.jpg-
२६O२६८९२
चिपळूण ः कार्यपूर्तीचा आनंद साजरा करताना वकील संघ आणि भाजप पदाधिकारी.
------
चिपळूणात दिवाणी न्यायालय
स्थापनेच्या निर्णयाचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबत वकिलांना आश्वस्त केले होते. यानंतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कॅबिनेट बैठकीत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे वकिलांसह नागरिकांनीही स्वागत केले. भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत चिपळूण तालुका वकील संघाच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व वकिलांनी कार्यपूर्तीचा आनंद साजरा केला.
भाजप चिपळूण शहर मंडल आयोजित या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी वकील संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ॲड. पांडे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन सावंत, उपाध्यक्ष ॲड. पवार, खजिनदार ॲड. मिलिंद तांबे, ॲड. मनोहर यादव, ॲड. नितीन केळकर, ॲड. संजय केतकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT