कोकण

चौकेचा पाणीप्रश्न सोडवणार

CD

swt2411.jpg
26893
चौके ः शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

चौके गावाचा पाणीप्रश्न सोडवणार
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ः ग्रामपंचायतीत इमारतीसाठीही निधी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : चौके गावाचा प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केले जातील. ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
चौके ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अक्षता गावडे, पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांचा सत्कार श्री. सामंत आणि गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच पी. के. चौकेकर होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘सध्या ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विकासकामे करताना कोणतीही अडचण येणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कामांचा आराखडा तयार ठेवावा. भराडी मंदिर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल.’’
ग्रामस्थांच्या वतीने काही मागण्या मांडण्यात आल्या. यात बिजेंद्र गावडे यांनी जुन्या नळपाणी योजनेमुळे उद्भवणाऱ्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधले आणि शासनाने खास बाब म्हणून नवीन योजना मंजूर करण्याची मागणी केली. माजी सरपंच सुरेश चौकेकर यांनी पथदीप बिलाचा आर्थिक भार ग्रामपंचायतींवर पडत असल्याचे सांगून हा खर्च पुन्हा शासनाने उचलण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्री. सामंत, श्री. चव्हाण आणि माजी सरपंच राजा गावडे यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी संघटना, वावळ्याचे भरड मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि चिरेखाण संघटना यांच्या वतीनेही नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राजा गावडे, सुरेश चौकेकर, बिजेंद्र गावडे, सदाशिव गावडे, उद्योजक नाना आंबेरकर, नितीन गावडे, पोलीस पाटील रोहन चौकेकर, माजी सरपंच मधुकर चौकेकर, सचिन आंबेरकर, मंगेश पात्रे, मोहन गावडे, दीनानाथ गावडे, रमाकांत देसाई, बंड्या गावडे, नीरा सावंत, उदय गावडे, विनायक गावडे, दत्ता गावडे, प्रमोद भोगावकर उपस्थित होते. सरपंच चौकेकर यांनी प्रास्ताविक, संतोष गावडे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत अधिकारी श्री. निकम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT