कोकण

नाट्यगृहप्रश्‍नी अधिकाऱ्यांची कानउघडणी

CD

26911

नाट्यगृहप्रश्‍नी अधिकाऱ्यांची कानउघडणी

मालवण नगराध्यक्षांचे खडेबोल; डागडुजीस एक कोटी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : येथील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत ‘आमने सामने’ या नाटकाच्या कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती दिली असून लवकरच हे नाट्यगृह सर्व सोयींनिशी सज्ज होईल, अशी ग्वाही दिली.
काही दिवसांपूर्वी नाट्यगृहातील गैरसोयींवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि पालिकेच्या सर्व सभापतींसह नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी खुर्च्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि एसी व पंख्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. ड्रेसिंग रूममधील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. नाट्यगृहाच्या प्रांगणात असलेल्या जुन्या गाड्या, दगडधोंडे आणि बांधकामाचे साहित्य तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या. नाट्यगृह परिसरात मद्यपींचा वावर आणि सांडपाण्याची दुर्गंधी यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
या पाहणी दरम्यान उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना अस्वच्छतेवरून खडेबोल सुनावले. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. गरज पडल्यास या प्रश्नी मुख्यमंत्र्यांचेही लक्ष वेधले जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार ओरसकर, राजू बिडये, राजा गावकर, शेखर गाड आणि नगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
---
आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी १ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबतचा प्रस्ताव लवकरच तांत्रिक प्रक्रियेसाठी पाठवला जाणार असून, संपूर्ण नाट्यगृह कायापालट करण्यासाठी प्रशासन जातीनिशी लक्ष देणार आहे.
- ममता वराडकर, नगराध्यक्षा, मालवण
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT