कोकण

ग्रंथालयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक

CD

लोगो ः रत्नागिरी ः राज्य ग्रंथालय संघ अधिवेशन
---

26956

ग्रंथालयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक

डॉ. गजानन कोटेवार ः कर्मचाऱ्यांची उपासमार, चाळीस टक्के अनुदान वाढ करा


सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २४ ः राज्यातील इतर प्रश्नांसाठी सातशे-आठशे कोटींच्या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी दिली जाते; मात्र ग्रंथालयाच्या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक केली जाते. यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेले वर्षभर ४० टक्के अनुदान वाढीचा प्रश्न रखडून ठेवला आहे. अर्थविभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता ४० टक्के अनुदान वाढीचा शासन आदेश ३१ मार्चपूर्वी काढावा, असे मत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी व्यक्त केले. रत्नागिरी येथील संघाच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे २७ वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४९ वे संयुक्त अधिवेशन रत्नागिरी येथे बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर रत्नागिरी येथे शनिवारी (ता. २१) आणि रविवार (ता. २२) या दोन दिवसांत पार पडले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्योपाध्यक्ष राम मेकले, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, स्थायी समिती सचिव सुनील कुबल, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह महेंद्र दळवी, रवींद्र कालेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मंगेश मसके, नंदू बनसोड आदी उपस्थित होते. अधिवेशनाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अधिवेशनाचे उद्‍घाटक रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
--
वर्षभरापासून प्रश्‍न रखडून ठेवला
डॉ. कोटेवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, ग्रंथालय संचालनालय यांना आतापर्यंत १४३ निवेदने दिली. मात्र, त्यांच्याकडून पत्रांना ‘वेटिंग’वर ठेवले जाते. निवेदनांची वेळीच दखल घेतली जात नाही. सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही मागण्यांसाठी ताटकळत ठेवले जात आहे. गेले वर्षभर चाळीस टक्के अनुदान वाढीचा प्रश्न रखडून ठेवला आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे दिली जातात. अनुदान वाढीची फाईल तयार आहे, ती तत्काळ वित्त विभागाकडे पाठवा, असे आदेश दिले, परंतु त्याला सहा महिने होऊन गेले तरी ती फाईल कुठे आहे तेच कळत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

Latest Marathi News Live Update : 25000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT