कोकण

-चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी धनंजय खातू

CD

‘चिपळूण अर्बन’च्या उपाध्यक्षपदी खातू
बिनविरोध निवड; गुहागरात प्रथमच पद
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ : दी चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी गुहागरमधील धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे गुहागरात उत्साहाचे वातावरण आहे. चिपळूण अर्बन बँकेच्या स्थापनेनंतर प्रथमच गुहागरला उपाध्यक्षपद मिळाले आहे.
कोअर कमिटीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संचालक मंडळ यांनी ठरवल्याप्रमाणे धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणूक कार्यक्रम अध्यासी अधिकारी शांताराम चव्हाण, सहाय्यक निबंधक चिपळूण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज खातू यांचा आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. बँकेचे कोअर कमिटी सदस्य सुचयशेट रेडीज, उमेश शेठ, मोहन शेठ, मिरगल मावळते उपाध्यक्ष रहमान दलवाई बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतीश खेडेकर, दिलीप दळी तसेच बँकेचे सर्व संचालक सदस्य बँकेचे सीईओ तुषार सूर्यवंशी तसेच अधिकारी व कर्मचारीवर्गाने खातू यांचे अभिनंदन केले.
या निवडीनंतर असगोली जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, नगरपालिकेचे नगरसेवक फैसल कासकर यांचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते. चिपळूण अर्बन बँक स्थापनेपासून प्रथमच गुहागरला उपाध्यक्षपद मिळाल्यामुळे गुहागरातील सर्व स्तरातून खातू यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT