कोकण

फणसोप येथे ''श्री देव लक्ष्मीकेशव'' पालखी उत्सव

CD

‘श्री देव लक्ष्मीकेशव’ पालखी उत्सव
फणसोपमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : तालुक्यातील फणसोप येथील ग्रामदैवत श्री देव लक्ष्मीकेशव यांचा पारंपरिक शिमगोत्सव यंदा २२ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळाने यावर्षीच्या उत्सवाचे नियोजन जाहीर केले असून, पालखी सोहळा, ग्रामप्रदक्षिणा आणि होळी उत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
​रविवार (ता. २२) पासून शिवरीची होळी आणणे व तिचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून उभी करण्यात आली. बुधवारपासून (ता. २५) दुपारी २ वा. श्रींची पालखी सजवण्यात येईल. त्यानंतर मंदिराभोवती पाच भोवत्या मारून मिरवणुकीने पालखी प्रथम मानकऱ्यांच्या घरी विराजमान होईल.​ गुरूवारी (ता. २६) फणसोप गाव येथील घरे घेण्याचा (पालखीभेटीचा) कार्यक्रम होणार आहे. ​शुक्रवारी (ता. २७) जुवीवाडी व नलावडेवाडी येथील घरांना पालखी भेट देईल. याच दिवशी रात्री १२ वा. श्री देव लक्ष्मीकेशव पालखीचा फणसोपचा ‘चतुःसीमेचा उत्सव’ साजरा होईल. सोमवारी (ता. २ ) रात्री चतुःसीमेची आंब्याची होळी उभी करणे. मंगळवारी ( ता. ३) मार्चला चंद्रग्रहण असल्याने संध्याकाळी ७ वा. होम व मांड विधी पार पडणार आहेत. ​​उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी, उपाध्यक्ष विक्रांत साळवी आणि सचिव अवधूत साळवी यांनी सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT