कोकण

ःकिरकोळ वादातून मजुराला फावड्याने मारहाण

CD

किरकोळ वादातून मजुरास मारहाण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः तालुक्यातील नारदखेरकी गावात मारुती मंदिर परिसरात किरकोळ वादातून मजुराला फावड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २३ फेब्रुवारीला सकाळी नारदखेरकी येथील मारूती मंदिराजवळ घडली. प्रमोद श्रीपत बांद्रे (वय ५३, रा. वरची बांद्रेवाडी, नारदखेरकी, चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गावकऱ्यांसमवेत मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले होते. त्या वेळी गावातीलच गणेश कृष्णा बांद्रे यांनी मस्करीत फिर्यादीला मिठी मारून पोटाला चिमटे काढले. त्यावर फिर्यादी यांनीही मस्करीत तुला राजूशेठसारखी सवय लागली का, असे म्हटले; मात्र, त्या वेळी तेथे उपस्थित असलेला संशयित उमेश लक्ष्मण बांद्रे (रा. वरची बांद्रेवाडी, नारदखेरकी ) हा संबंधित राजूशेठचा चुलत भाऊ असल्याने त्याला या वक्तव्याचा राग आला. रागाच्या भरात संशयिताने बांधकामस्थळी पडलेले फावडे उचलून फिर्यादीवर उगारले. हे फावडे फिर्यादीच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला आणि कानाच्या मधोमध लागल्याने त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी उमेश बांद्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

NMMS Exam Result 2026 : एनएमएमएस परीक्षेची गुण यादी जाहीर

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांच्याकडे इंडोनेशिया शिष्टमंडळाचे नेतृत्व, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये नियुक्ती

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वेग

SCROLL FOR NEXT