कोकण

-क्राईम

CD

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ ः तालुक्यातील दाभोळ येथील दालभेश्वर पाखाडी परिसरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारीला उघडकीस आली. आकाश अरुण वेद्रे (वय २६, रा. दालभेश्वर पाखाडी, ता. दापोली ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झाले होते. त्यामुळे दालभेश्वर पाखाडी येथे नवीन घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या कामासाठी आकाश हा सुमारे सहा महिन्यांपूर्वी गावी परत आला होता आणि आई-वडिलांसोबत राहत होता. २३ फेब्रुवारीला रात्री आकाशने आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपले; मात्र २४ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास त्याची आई उठली असता आकाश घरात दिसला नाही. काही वेळ तो परत न आल्याने संशय आल्याने त्यांनी बॅटरीच्या उजेडात परिसरात शोध घेतला. दरम्यान नातेवाईक दशरथ शंकर वेद्रे यांच्या नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामातील एका खोलीत आकाश हा लोखंडी भाल्याला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. हे पाहून आईने आरडाओरडा केला. त्यानंतर रवींद्र नवजेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आकाशने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी आकाशला मृत घोषित केले. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT