कोकण

सावर्डेचे पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

CD

सावर्डेचे पोलिस उपनिरीक्षक
लाच मागितल्याने जाळ्यात
चिपळूणमध्ये सापळा ः विम्याच्या दाव्यासाठी २५ हजारची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः सावर्डे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मनीष कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. १५ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळुणात सोमवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली. विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी कांबळे यांनी तब्बल २५ हजारांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपयांवर तोडगा निघाला होता.
सेवानिवृत्तीला वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच कांबळे याच्यावर ही कारवाई झाली आहे. रत्नागिरी विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण येथे सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर क्र. १४/२०२६ चा तपास प्रलंबित होता. या गुन्ह्यातील मृताच्या वारसांना विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावयाचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीएआर फॉर्म आवश्यक होते. ही कागदपत्रे देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने २२ फेब्रुवारीला २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने २३ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर याविषयी दोन पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता कांबळे याने तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्यास सांगितले. ही रक्कम स्वतःकडे न घेता अभिजित प्रकाश शिर्के (वय ४२, रा. पाग, चिपळूण) यांच्याकडे देण्याचे निर्देश तक्रारदारास फोनद्वारे दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चिपळूण पोलिस ठाण्याजवळील दुकानात तक्रारदाराने शिर्के यांची भेट घेतली. त्या वेळी शिर्के यांनी फोनवरून संबंधित कांबळे याच्याशी संपर्क साधला. दोघांतील संभाषणानंतर शिर्के यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले. ही रक्कम पोलिस उपनिरीक्षकांच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाने शिर्के यांना रकमेसह ताब्यात घेतले. या दोघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT