rat२५p१२.jpg-
P२६O२७०७४
रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. केतन चौधरी यांना मेडिकल हेल्थ कार्डचे वितरण करताना डॉ. शेखर कोवळे. सोबत डॉ. आर्या माने, मानसी नाखरेकर, मयूर कदम आदी.
----
सागरी संशोधन केंद्रात ‘हेल्थ कार्ड’चे वाटप
टिळक हॉस्पिटलचा पुढाकार ; आरोग्य सुरक्षित ठेवण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील कर्मचारी कल्याणासाठी विशेष मेडिकल हेल्थ कार्ड वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडले. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास वर्षभरात दोन लाखापेक्षा अधिक पर्यटक आणि शालेय विद्यार्थी भेट देत असतात. त्यामुळे हे मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असते. म्हणूनच येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
‘कर्मचाऱ्यांचे आरोग्य हीच संस्थेची संपत्ती आहे,’ अशी भावना याप्रसंगी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व केंद्राचे प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समिधा गोरे, प्रशासकीय सल्लागार डॉ. शेखर कोवळे आणि हॉस्पिटलमधील टीम, प्रशासनाचे आभार मानले.
डॉ. शेखर कोवळे यांनी भाषणामध्ये उद्देश केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुलभ, किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा असल्याचे सांगितले. त्यांनी लोकमान्य टिळक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपचार पद्धती, यंत्रणा याबाबत माहिती दिली. डॉ. आर्या माने यांनी लोकमान्य टिळक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती सांगितली.
यावेळी डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. आर्या माने, नर्स मानसी नाखरेकर आणि हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी मयूर कदम उपस्थित होते.
----
हेल्थ कार्डवर सवलती
या हेल्थ कार्डच्या माध्यमातून संबंधित रुग्णालयात विविध वैद्यकीय तपासण्या, सल्लामसलत, औषधे व उपचारांवर विशेष सवलती उपलब्ध मिळणार आहेत. या उपक्रमास केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.