rat२५p१४.jpg-
२६O२७०७६
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या मैत्री १९८७ बॅचच्या स्नेहसंमेलनात सहभागी माजी विद्यार्थी.
----
‘मैत्री ८७’ स्नेहसंमेलन उत्साहात
फाटक हायस्कूलमध्ये फनी गेम्ससह, विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : येथील फाटक हायस्कूलच्या १९८६-८७ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन केळ्ये येथील रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात साजरे झाले. फनी गेम्स, गाणी, गप्पा गोष्टी यासह शाळेच्या जुन्या आठवणी जागवत हे संमेलन दिवसभर रंगले.
मैत्री ८७ चे हे पाचवे संमेलन होते. यापूर्वी २००४ मध्ये फाटक हायस्कूल, नंतर भाट्ये, गणेशगुळे आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात मैत्री ८७ ची संमेलने आयोजित करण्यात आली होती. या संमेलनात ८१ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावत संमेलनाचा आनंद लुटला. १९८७ च्या बॅचमधील अ, ब, क आणि ड या चारही वर्गातील माजी विद्यार्थ्यांचे हे संमेलन उत्साहात साजरे झाले. स्वामी स्वरूपानंद रचित प्रार्थना म्हणून संमेलनाची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या शिक्षक, माजी मित्र-मैत्रिणींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांनी आपापले अनुभवकथन आणि परिचय सादर केला.
सकाळी कोकणी न्याहरी व दुपारी खास कोकणी जेवणाने संमेलनाची रंगत वाढली. लगोरी, संगीतखुर्ची आदीसह फनी गेम्सनी संमेलन अतिशय आनंदात साजरे झाले. संमेलनात माजी विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता. वयाची ५४-५५ वर्षे पार केलेले हे माजी विद्यार्थी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र शाळा, रत्नागिरीशी नाळ न तोडता मदत करण्याची भावना या सर्वांनी व्यक्त केली. शासकीय नोकरी, खासगी कंपनीत अधिकारी, व्यावसायिक, शेतकरी, प्राध्यापक, परदेशी नोकरी करणारे अनेक माजी विद्यार्थी संमेलनाकरिता आवर्जून उपस्थित राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.