निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : राष्ट्रसंत, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उपाध्यक्ष वसंत पिंपळकर यांच्या पुढाकाराने ‘संत गाडगेबाबा परीट समाज संस्थे’ने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली पेठमाप येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात झाला.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेचा निकाल असा, (प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ याप्रमाणे) : निबंध स्पर्धा शालेय गट (८ वी ते १० वी) : सार्थक वैभव कदम, सार्थक प्रकाश महाडिक, अंतरा अशोक इंगवले, पूर्वी विवेक कदम, नीरजा नितीन कदम, प्रांजल योगेश चाळके. महाविद्यालयीन गट : श्लोका नवनीत भोसले, रिया अशोक चाळके, आर्या नीलेश चाळके, प्रतीक्षा दीपक कदम, सई संजय मिरगावकर.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. विनायक होमकळस यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरणावेळी संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे सचिव प्रा. कचेश्वर राऊत, पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, सल्लागार आबा महाडिक, हसमुखभाई पांगारकर, दीपक म. कदम, संतोष कदम, श्रीकृष्ण शिंदे, सावित्री होमकळस यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.