कोकण

प्रोजेक्टची झळाळी, कौशल्यांची कमाल

CD

27108


प्रोजेक्टची झळाळी, कौशल्यांची कमाल

‘एमआयटीएम’मध्ये उपक्रम; ‘रेक्स’, ‘मेट्रोपल्स’ दिमाखदार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित, सुकळवाड (सिंधुदुर्गनगरी) येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे ‘रेक्स’ आणि ‘मेट्रोपल्स’ या तांत्रिक व अतांत्रिक कार्यक्रमांचे उद्‍घाटन सिंधुदुर्गचे प्रशिक्षणार्थी सल्लागार उमेश कुलकर्णी आणि आयटीआय ओरोसचे एम. ए. परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. ‘रेक्स’ या नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी विविध विषयांवर नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केले. ‘मेट्रोपल्स २०२६’ अंतर्गत तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही विभागांतून विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये वेबसाईट वॉर, ड्राफ्टिक्स, ऑटोकॅड, कोड वॉर, इन्स्टारील, स्पॉट फोटोग्राफी, रांगोळी, डेबिट, मिनीमिलिशिया, ट्रेझर हंट, बीजीएमआय, पीपीटी प्रेझेंटेशन, स्पॉट पेंटिंग आणि ॲड वॉर यांचा समावेश होता. या महोत्सवात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध प्रात्यक्षिके आणि प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, उपप्राचार्य पूनम कदम, विद्यार्थी जनरल सेक्रेटरी वैभव शेट्ये यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल संस्थाध्यक्ष संतोष पाल, संचालक विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम आणि विश्वस्त केतन कदम यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सराईत सोनसाखळी चोराच्या पंतनगर पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT