कोकण

नृत्य-गीतांतून विठ्ठल दर्शन; पाडलोसभर भक्तीचे स्पंदन

CD

27109

नृत्य-गीतांतून विठ्ठल दर्शन;
पाडलोसभर भक्तीचे स्पंदन

गाव ग्रुपतर्फे सांस्कृतिक सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः पाडलोस गाव ग्रुपतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संस्कृतीतून विठ्ठलाचे दर्शन घडल्याने ग्रामस्थ भारावून गेले. महिलांनी विठ्ठलावर आधारित मराठी नृत्यगीत सादर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमामुळे गावात भक्ती, परंपरा आणि कला यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
गावातील लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी यात आपले कौशल्य सादर केले. आठवीतील सानिका गावडे हिने सादर केलेले समईनृत्य विशेष आकर्षण ठरले. कोणतेही साहाय्य न घेता डोक्यावर समई घेऊन तिने सादर केलेल्या नृत्यातून मराठी संस्कृती जपण्याचा प्रभावी संदेश दिला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. तुकाराम गावडे यांनी सादर केलेली वासुदेवाची भूमिका प्रेक्षकांना भावली. पारंपरिक वेशभूषा आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह बाल क्रीडा महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : स्फोटात २० कामगारांचा बळी; वेदांता प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिकारी आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT