कोकण

सायली गावडेंना पैठणीचा बहुमान

CD

27110
पाडलोस ः सायली गावडे यांना पैठणी प्रदान करताना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गावडे. सोबत मान्यवर.

सायली गावडेंना पैठणीचा बहुमान
बांदा ः पाडलोस गाव ग्रुपतर्फे श्री रवळनाथ रंगमंचावर आयोजित केलेल्या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या सहभागातून रंगलेल्या या स्पर्धेत सायली गावडे पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय चषक श्रेया आंबेकर यांनी तर तृतीय पारितोषिक मीनाक्षी गावडे यांनी मिळविले. या विशेष कार्यक्रमात विविध प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यांतून महिलांनी आपली हुशारी, आत्मविश्वास दाखवून दिला. गावातील तब्बल ३३ महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे समालोचन बादल चौधरी यांनी केले. पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी सर्व सहभागी महिला, आयोजक, बक्षीस पुरस्कर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
.....................
27111

बिशप पिनहेरो यांची मिलाग्रीस चर्चला भेट
सावंतवाडी ः कॅथोलिक धर्मप्रांताचे सिंधुदुर्ग बिशप अग्नेलो पिनहेरो यांनी येथील मिलाग्रीस चर्चला भेट देत पाहणी केली. येथील फादर व ख्रिस्ती धर्मियांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. नव्याने बांधण्यात आलेल्या चर्चचे त्यांनी कौतुक केले. येत्या ९ मे रोजी या चर्चचे लोकार्पण होणार आहे. हे चर्च १६५२ मध्ये बांधण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून जुन्या चर्चच्या ठिकाणी नवीन चर्च उभारण्याचे काम सुरू होते. अखेर हे काम पूर्णत्वास आले आहे. येत्या मे महिन्यात नवीन चर्चचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवे बिशप पिनहेरो यांनी येथे भेट देत चर्चची पहाणी केली. यावेळी गोव्याचे बिशप सिमीयाव फर्नांडिस, फादर मिलेट डिसोझा, फॅलिक्स लोबो, रिचर्ड साल्डना, ऑल्विन गोन्सालवीस, मिल्टन मोल्टेनो, अमृत गोन्सालवीस आदींसह चर्चेचे सदस्य, कॅथोलिक बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याच्या मंत्रिमंडळात जुने नेते कायम राहू शकत नाही, नवीन चेहरे...; उपमुख्यमंत्र्यांचं सुचक वक्तव्य, असं नेमकं का म्हणाले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT