कोकण

मुक्ताई ॲकॅडमीचे बुद्धिबळपटू चमकले

CD

27112

मुक्ताई ॲकॅडमीचे बुद्धिबळपटू चमकले

गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा; बाळकृष्ण पेडणेकरला नववे स्थान

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः येथील राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याने लेफ्टनंट कमांडर गोपाळ सुखटणकर यांच्या स्मरणार्थ पणजी-गोवा येथे आयोजित केलेल्या चौदाव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नववा क्रमांक पटकावला.
पणजी, गोवा येथील मुष्टीफंड हायस्कूल पॅरेंट्स-टिचर्स असोसिएशन आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गोव्यासोबत इतर राज्यांतील २२४ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुर्वांक कोचरेकर, योगी लेले, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो, अथांग देसाई, स्वरुप राऊळ, वेदांत डांगी या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
बाळकृष्णने उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सात राऊंड्स जिंकून सात गुण केले. या स्पर्धेत त्याने आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग चौतीस गुणांनी वाढवले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने दबदबा कायम ठेवला आहे. त्याला असोसिएशनचे अध्यक्ष महेश कांदळकर, उदयोजक प्रशांत रेडकर, आंतरराष्ट्रीय पंच अरविंद म्हामळ, दत्ताराम पिंगे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष, प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याच्या मंत्रिमंडळात जुने नेते कायम राहू शकत नाही, नवीन चेहरे...; उपमुख्यमंत्र्यांचं सुचक वक्तव्य, असं नेमकं का म्हणाले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT