सावंतवाडीत पालकांसाठी
१७ मार्चला वेशभूषा स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ : येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, प्राथमिक शाळेच्यावतीने संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पालकांसाठी तालुकास्तरीय ‘वेशभूषा स्पर्धा- २०२६’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १७ मार्चला सकाळी ११ वाजता कळसुलकर इंग्लिश स्कूल सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचा मुख्य विषय ‘थोर समाजसुधारक’ असा असून प्रत्येक स्पर्धकाने दोन मिनिटांत साभिनय सादरीकरण करणे अपेक्षित आहे. तालुक्यातील कोणत्याही शाळेत पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक यात सहभागी होऊ शकतात. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्या ५० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी आपल्या पाल्याचे शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी मुख्याध्यापक श्री. सावंत, शिक्षक श्री. वरक किंवा शिक्षिका श्रीमती गुंजाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव, कलात्मक सादरीकरण आणि पालक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तालुक्यातील पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.