कोकण

आडविरेतील नदीनाल्यांसह परिसर झाला स्वच्छ

CD

-rat२५p१५.jpg-
२६O२७१२०
राजापूर ः नदीपात्राची स्वच्छता करताना संत निरंकारी मंडळ-कोदवली राजापूरचे भक्तगण.
-----
आडविरेतील नदीनाल्यांसह परिसर चकाचक
संत निरंकारी मिशन ; प्लॅस्टिकसह अन्य कचऱ्याची विल्हेवाट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’अंतर्गत तालुक्यातील आडीवरे येथे शेकडो भक्तांन नदीनाल्यांसह परिसराची स्वच्छता करीत समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला.
संत निरंकारी मंडळ कोदवलीचे मुखी सिद्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवती मंदिर, महाकाली मंदिर परिसरासह त्या भागातील नदीनाल्याचीही स्वच्छता करण्यात आली. नदी-नाल्यातील पाणी प्रदूषित करणारे आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकसह अन्य कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला. या वेळी संत निरंकारी मंडळाचे सेवादल युनिटचे संचालक दत्तराज सुवार, नारी सत्संग प्रमुख चारुलता चाळके, बालसत्संग प्रमुख सारीका कोतरे, प्रकाश हातणकर, विजय बंडबे, जयवंत मांडवकर, सुभाष नवाळे, दशरथ लिगम, रामचंद्र मांडवकर, प्रशांत घाणेकर यांच्यासह मोठ्यासंख्येने भक्तगण सहभागी झाले होते.
---------
कोट
स्वच्छ जल, स्वच्छ मन हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.
--बाळकृष्ण मांडवकर, संदेश दास, संत निरंकारी मंडळ, कोदवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT