27139
‘मशीन लर्निंग’मुळे फार्मसी क्षेत्रात क्रांती
डॉ. तितीक्ष देवळे ः भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय परिषद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः एआय आणि मशीन लर्निंगमुळे औषध शोध प्रक्रियेत क्रांतिकारी बदल होत असून याचा फायदा निश्चितच देशाच्या विकासासाठी होणार आहे, असे प्रतिपादन गोवा येथील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. तितीक्ष देवळे यांनी केले.
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘औषध शोध आणि विकासातील प्रगत तंत्रज्ञान’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद उत्साहात झाली. या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातसह विविध राज्यांतून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात ६० पेक्षा अधिक शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी औषधनिर्माणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी डॉ. सुनीलकुमार बोथरा (प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी) यांनी संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर यांनी औषध निर्मितीतील सुरक्षा व नियामक अनुरूपतेबाबत माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शोधनिबंधपर भित्तीपत्रक स्पर्धा पार पडली. पदवी विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या काजल आडणेकर हिने प्रथम, लोहित तावडे याने द्वितीय तर ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी, खेड येथील सानिका मोरे आणि सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली येथील विश्रुती विचारे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. पदविका विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या मृण्मयी सावंत हिने प्रथम व मासिरा नदाफ हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
पदव्युत्तर व विद्यावाचस्पती विभागात भारती विद्यापीठ, कोल्हापूरच्या जिज्ञासा पंतवालावलकर हिने प्रथम, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रमदा नाईक हिने द्वितीय व डी.वाय.पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डीच्या कांचन नाईक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना प्रमाणपत्र व विजयचिन्ह देऊन गौरविले. प्रा. नमिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तुषार रुकारी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.