-rat२५p५.jpg-
P२६O२७०६७
खेड ः भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जिल्हाप्रशासनाला निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.
----
भूमी अभिलेख विभागातील कामे ठप्प
प्रलंबित कामांसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार ; आंदोलनाचा सामान्यांना फटका, २७ ला मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः राज्य भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या सामूहिक रजा आंदोलनाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. सोमवारपासून (ता. २३) कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने खेड तालुक्यासह जिल्हाभरातील जमिनीची मोजणी आणि शेकडो फेरफार नोंदींची कामे गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
भूमी अभिलेख विभागातील विविध संघटनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, शासनाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. २३ ते २६ फेब्रुवारी या काळात सामूहिक रजा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आंदोलन सुरू झाले असल्याने महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाची तांत्रिक कामे थांबली आहेत.
या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून २७ फेब्रुवारीला पुण्यातील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तेथे धरणे आंदोलन केले जाईल. यानंतरही जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २ मार्चपासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. जिल्ह्यात सध्या ५०० हून अधिक जमिनींच्या मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच शेकडो फेरफार नोंदींचे काम थांबल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बँकांची कर्जप्रकरणे रखडली आहेत.
--------
कोट
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने आमची जमिनीची मोजणी आणि महत्त्वाची महसुली कामे खोळंबली आहेत. वारंवार चकरा मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
— राजेंद्र मोरे, शिवतर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.