सुनत्रा पवार यांच्याकडे
निधीचीमागणी
चिपळूण ः कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय बनून राहिलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी तीनशे कोटींचा निधी मंजूर व्हावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले कार्य लढा व त्याग पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. या स्थळाचे ऐतिहासिक ओळख जतन करून ठेवणे गरजेचे आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय उपस्थित करून याविषयी संवाद साधला होता असे पत्रात नमूद केले आहे.
‘रेफरिंग सेंटरची
मान्यता द्या’
सावर्डे ः डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल निदान व संशोधन केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्शन सेंटरला शासनाचे अधिकृत रेफरिंग सेंटर म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी आमदार शेखर निकम यांनी केली. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असून, शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यास कोकणातील ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना वेळेवर तपासणी व उपचाराचा मोठा लाभ होणार आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने डेरवण येथील कॅन्सर डिटेक्शन सेंटरला अधिकृत मान्यता मिळणे कोकणवासीयांसाठी दिलासादायक आहे. यापूर्वी जिल्ह्याला देण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी व्हॅन सध्या कार्यरत नसल्याकडे लक्ष वेधत त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच राज्यभर कॅन्सर तपासणी व्हॅनची संख्या वाढवावी, अशी आग्रही मागणीही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.