-rat२५p१६.jpg-
२६O२७१४३
पावस ः दाभिळआंबेरे शाळेची रंगरंगोटी करताना कामगार.
----
दाभिळआंबेरे शाळेची लोकसहभागातून रंगरंगोटी
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील दाभीळ-आंबेरे शाळा ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षकांच्या सहकार्यातून भरारी घेत आहे. या शाळेला पालक व शिक्षकांनी एकत्रित येऊन शाळेची रंगरंगोटी, दारे, खिडक्या दुरुस्तीसाठी सुमारे एक लाख रुपये जमा केले. या सगळ्यामध्ये नाट्य रसिक मंडळाने (मुंबई) व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान होते. डोर्ले ग्रामपंचायतीने रंगरंगोटीसाठी ५५ हजार रुपयांचे सहकार्य केले. गावातील रघुनाथ भोसले यांनी १५ हजार रुपयांचा टिव्ही, प्रवीण पाटकर यांनी १० हजाराच्या खुर्च्या, बापू कुड यांनी साडेसात हजाराचे कपाट, राजेश पाटकर यांनी दर्शनी भागातील नोटीस बोर्ड, कपाट असे साहित्य दिले.
मुख्याध्यापक मंदार नार्वेकर आणि सहशिक्षिकांनी शाळेमध्ये गुणवत्तावाढीसाठीही प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.