देवरूखच्या विकासाला मिळणार गती
सर्वसाधारण सभा ; ४२ कोटी ६० लाखांचे अंदाजपत्रक मंजूर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ४२ कोटी ६० लाख रुपयांचे अंदापत्रक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप या अंदाजपत्रकातून स्पष्ट करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी प्रशांत भोसले व लेखा विभागाने अंदाजपत्रक सादर करताना आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विकासाभिमुख नियोजन यावर भर दिला. मर्यादित साधनसामग्रीतूनही ४ लाख २३ हजार रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनक्षमतेचे कौतुक करण्यात आले. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महसुली व भांडवली खर्चाचे सुयोग्य नियोजन करत नागरीकांना मुलभूत सेवा सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचा आराखडा मांडला आहे. सभेदरम्यान काही सदस्यांनी सूचना व अपेक्षा मांडल्या; मात्र सकारात्मक चर्चा होऊन सर्वांनी शहराच्या हिताला प्राधान्य देत अंदाजपत्रकाला पाठिंबा दर्शविला. येणारे आर्थिक वर्ष देवरूखच्या शहराच्या विकासाला गती देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
----
चौकट
शासकीय योजना प्रभावीपणे राबवणार
अर्थसंकल्पात नवीन पाणीपुरवठा योजना बळकटीकरण, स्वच्छता व्यवस्था, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, गटारी बांधकाम, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.