कोकण

‘यशवंतगड’- ‘शिरोडा’ झुलता पूल उभारा

CD

27188

‘यशवंतगड’- ‘शिरोडा’ झुलता पूल उभारा

रेडी पंचक्रोशीतून मागणी, आमदार राणेंना निवेदन, सकारात्मक निर्णयाची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २५ ः रेडी शिरोडा भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याच्या दृष्टीने रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा समुद्र किनारी झुलता पूल होणे गरजेचे आहे. या पुलाच्या कामास मंजुरी मिळून कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य प्रीतेश राऊळ व सरपंच रामसिंग राणे यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी संबंधित पुलाच्या निधीसाठी पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करून मागणी करणार असल्याची ग्वाही आमदार राणे यांनी दिली. आमदार राणे यांनी येथील ‘सरपंच चषक’ स्पर्धेला भेट दिली. यादरम्यान जिल्हा परिषद सदस्य राऊळ व सरपंच राणे यांच्यावतीने या पुलाबाबत मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की रेडी यशवंत गड आणि शिरोडा वेळागर समुद्र किनारा जोडणारा झुलता पूल झाल्यास खऱ्या अर्थाने तो या भागासाठी पर्यटन सेतू ठरू शकतो. पर्यटकांना, शिवप्रेमींना, भाविकांना शिरोडा वेळागर येथून भ्रमंती करत यशवंतगड येथे येण्यास सुलभ होणार आहे. परिणामी या ठिकाणी अनेक स्थानिक युवकांना छोटी छोटी दुकाने उभी करून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
---
...तर पर्यटनाला मिळेल चालना!
रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा समुद्र किनारी झुलता पूल झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळेल. प्रशासन स्तर उपसचिव पर्यटन विभागाकडे हा प्रस्ताव थांबलेला आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २०२४ मध्ये या कामाला शिफारस दिली होती. मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून झुलता पुलासाठी शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT