कोकण

मोटार न्यूट्रल होऊन एसटी बसला धडकली

CD

27202


मोटार न्यूट्रल होऊन
एसटी बसला धडकली

सावंतवाडीतील प्रकार; वाहतूक खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः पार्किंग करून ठेवलेली मोटार न्युट्रल होऊन एसटी बसला जाऊन धडकल्याचा प्रकार आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील चिटणीसनाका परिसरात घडला. या विचित्र अपघातात मोटारीचे काहीसे नुकसान झाले.
बराच वेळ चालक त्या ठिकाणी न पोहचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी पोलिसांनी येऊन मोटार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. शहरातील चिटणीस नाका परिसरात उतारावर मोटार पार्किंग करून चालक आपल्या कामाला गेला होता; मात्र अचानक ही मोटार न्युट्रल झाल्याने उताराच्या दिशेने पुढे जाऊन समोर प्रवाशी उतरविण्यासाठी थांबलेल्या एसटी बसला जाऊन धडकली. यात मोटारीच्या समोरील भागाचे नुकसान झाले. बराच वेळ चालक न आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी मोटार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. बऱ्याच उशिराने चालक घटनास्थळी पोहोचला. हा अपघात परस्पर मिटविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

SCROLL FOR NEXT