कोकण

३३ गावात टंचाईची शक्यता

CD

खेडमधील ३३ गावात टंचाईची शक्यता
आराखडा जाहीर ; धनगरवाड्यांची संख्या सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ : तालुक्यात यंदा पाणीटंचाई आराखड्यात ३३ गावांमधील ५० वाड्यांचा समावेश आहे. येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य आराखडा तयार करून मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील धनगरवाड्यांची संख्या सर्वाधिक आहे.
गतवर्षी तालुक्यातील १९ गावांतील ३७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाई कालावधीत गाव-वाड्यांमध्ये ८३ फेऱ्या धावल्या होत्या. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये राबवण्यात आलेल्या जलजीवन योजनांमुळे टंचाईग्रस्त गाव वाड्यांच्या संख्येत घट झाली. यावर्षी तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात घेरारसाळगड येथील बुथराईवाडी, भराडे धनगरवाडी, निमणी धनगरवाडी, पेठ तांबड बौद्धवाडी, तांबड बौद्धवाडी, खवटी खालची, वरची धनगरवाडी, सवेणी धनगरवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, कळंबणी-दंडवाडी, वावेतर्फे नातू-ढेबेवाडी, तिसंगी खांडेकरवाडी, धनगरवाडी, मांडवे वाडीबेलदार, हुंबरी-वाडीबीड, तळे पालांडेवाडी, बौद्धवाडी, धनगरवाडी, मोहाने देऊळवाडी, जामगे- बौद्धवाडी, मोहल्ला, जैतापूर-जैतापूरवाडी, कुंभाड माणग्याचीवाडी, गावठाण, कुळवंडी-दांडेकरवाडी, शिंगरी-पुरे बुद्रुक, घेरापालगड, किंजळेतर्फे नातू केळणे-मांगलेवाडी, भोसलेवाडी, गुणदे काळकाईवाडी, चिरणी धनगरवाडी, माळवाडी, गवळवाडी, बोलेवाडी, शेल्डी-धनगरवाडी, जानकरवाडी, तळघर, अणस्पुरे-मालपवाडी, कासई बोरवाडी, ताठरेवाडी, कावळे-धनगरवाडी, तिसंगी-धनगरवाडी, बिजघर-कोंडवाडी, कोकाटेवाडी, बौद्धवाडी, नांदिवली-दंडवाडी, हुंबरी-शिंदेवाडी, तळे-जांभुळवाडी या गाव-वाड्यांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित गाव-वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ठेवली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT