कोकण

महाआवास अभियान अंतर्गत देवगड पंचायत समितीचा गौरव

CD

swt२६११.jpg
२७३००
देवगड : येथील प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला.

महाआवास अभियान अंतर्गत
देवगड पंचायत समितीचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ : विविध पुरस्काराबद्दल येथील पंचायत समितीचा गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात आलेल्या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते विभाग स्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
याचाच एक भाग म्हणून येथील पंचायत समितीने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण २०२२-२३ अंतर्गत पंचायत समितीला प्रथम क्रमांक तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमधून २०२१ -२२ मध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार कोकण विभाग आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, अधीक्षक कुणाल मांजरेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तिर्लोट या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायत मिठमुंबरी यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे, अशी माहिती पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT