कोकण

परीट समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध

CD

swt266.jpg
27306
कुडाळ : श्री संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना दिलीप भालेकर, शांताराम कदम, नंदकुमार राक्षे, दीपाली भालेकर व इतर मान्यवर.

परीट समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध
लोकप्रतिनिधींची ग्वाही ः सावंतवाडीत संत गाडगे महाराज जयंती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, कुडाळच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात समाजातील नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा विशेष सत्कारही करण्यात आला. समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली.
​कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण प्रदेश परीट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी परीट समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, खजिनदार नंदकुमार राक्षे, महिला जिल्हाध्यक्ष दीपाली भालेकर उपस्थित होते. या शिबिरात १५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
या सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, नगरसेवक व महिला बालकल्याण सभापती दीपाली भालेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
​​यावेळी व्यासपीठावर दीपक चव्हाण, संजय गायकवाड, किशोर वासकर, राजेंद्र भालेकर, मोहन वालकर, शेखर कडू, भालचंद्र करंजेकर, विजय पाटील, महेंद्र आरोलकर, सदानंद अणावकर, प्रसाद पाटकर यांसह महिला पदाधिकारी सविता मडवळ, मंजुषा आरोलकर, मनाली चव्हाण, अक्षता कुडाळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदानंद अणावकर, तात्या कुडाळकर, विजय आजगावकर, प्रदीप नारकर, अनिल शिवडावकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. प्रदीप नारकर यांनी सूत्रसंचालन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT