swt268.jpg
27308
बांदा ः डिंगणे बांबरवाडी मार्गावरील कालव्यालगत संरक्षक रेलिंग बसविण्यात आले आहेत.
बांदा डिंगणे बांबरवाडी
रस्त्यावर ‘संरक्षक गार्ड’
ग्रामस्थांना दिलासा ः काणेकरांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः बांदा-डिंगणे बांबरवाडी मार्गावरील कालव्यालगतचा धोकादायक रस्ता अखेर सुरक्षित झाला असून त्या ठिकाणी संरक्षक गार्ड (रेलिंग) बसविले आहेत. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना (ठाकरे गट) बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
बांदा डिंगणे मार्गावर कालव्याच्या कडेला असलेला रस्ता अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरला होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला कोणतीही संरक्षक भिंत किंवा गार्ड नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत होता. काही वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघातही घडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर काणेकर यांनी संबंधित विभागाकडे वारंवार निवेदने देत संरक्षक गार्ड बसविण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर प्रशासनाने दखल घेत कालवा मार्गावर मजबूत लोखंडी संरक्षक गार्ड बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार व रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. काणेकर यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासह संबंधित विभागाचेही आभार मानले.