कोकण

मंडणगड, दापोली, खेड पं. स. ला नवीन इमारत

CD

पंचायत समितीच्या इमारतींना मंजुरी
मंडणगड–दापोली–खेडसाठी ३० कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : पंचायत समिती स्तरावरील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शासनाने मंडणगड, दापोली आणि खेड येथील प्रशासकीय इमारतींच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. नागरिकांना विविध कामांसाठी भटकंती करावी लागू नये आणि सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
मंडणगड तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीसाठी नऊ कोटी ४६ लाख रुपये, दापोलीसाठी नऊ कोटी ४२ लाख रुपये तर खेडमधील इमारतीच्या विस्तारीकरणासाठी १० कोटी ५२ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ही तिन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मानकांनुसार पूर्ण करण्यात येणार असून, पूर्ण झाल्यानंतर पंचायत समितीअंतर्गत सर्व विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. सुमारे २९ कोटी ४० लाख रुपयांहून अधिक निधी या कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता हक्काची नवीन इमारत मिळणार असल्याने सर्व पंचायत समिती सदस्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत राज्यमंत्री कदम यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT