महसूल प्रश्नांचा त्वरित निपटारा
लांजा तालुक्यात, ७ मार्चपासून एक खिडकी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २६ ः ग्रामीण भागातील जनतेचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी लांजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा १) आयोजित करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार तहसीलदार कार्यालयाने या मोहिमेचे नियोजन पूर्ण केले असून, तालुक्यात विविध स्तरांवर या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय नियोजनानुसार, हे शिबिर मंडळस्तरावर ७ व १४ मार्च आणि १० व १७ एप्रिल, नगरपंचायत स्तरावर ८ व १५ मे रोजी आयोजित केले आहे. या समाधान शिबिरांमध्ये ‘एक खिडकी’ प्रणाली राबवली जाणार आहे. एकाच ठिकाणी सर्व महसूल अधिकारी उपलब्ध राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, प्रक्रिया करणे आणि ते तत्काळ निकाली काढणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये फेरफार व सातबारा दुरूस्ती, विविध दाखले वितरण करणे, भूमिअभिलेख व मोजणीविषयक कागदपत्रांची तपासणी करणे, नवीन योजनांची माहिती देणे अशी कामे केली जाणार आहेत. या अभियानासाठी तहसीलदार कार्यालयाकडून आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेत गटविकास अधिकारी (पंचायत समिती), मुख्याधिकारी (नगरपंचायत), उपअधीक्षक भूमीअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांसह सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.